
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।
आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता यांचा जन्मोत्सव २६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात तयारीला सुरुवात झाली आहे.
या निमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गावोगावी शोभायात्रा, मिरवणुका, भजन-पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात प्रतिमा पूजन, गुलाल व पुष्पवृष्टी करत जयघोष केला जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे आंध्रप्रदेशातील पेनीगुंडा येथे असलेल्या जन्मस्थळीही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात.
महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्यासह गोविंद बिडवाई, ज्ञानेश्वर महाजन, अनिल मनाठकर, सदानंद मेडेवार, प्रदीप कोकडवार आदी पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जन्मोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis