जनगणनेच्या प्रशिक्षणास रत्नागिरीत सुरुवात
रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची सुरुवात वेग घेऊ लागली आहे. जनगणनेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालिकेच्या संत गाडगे बाबा सभागृहात फिल्टर ट्रेनरसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज झा
जनगणनेच्या प्रशिक्षणास रत्नागिरीत सुरुवात


रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची सुरुवात वेग घेऊ लागली आहे. जनगणनेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालिकेच्या संत गाडगे बाबा सभागृहात फिल्टर ट्रेनरसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज झाले.

उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी उद्घाटन केले. प्रास्ताविक जनगणना जिल्हा समन्वय अधिकारी संजीव गावकर यांनी केले. प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे आणि मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी प्रशिक्षण दिले.

सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे व अमोल करंडे यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले. यावेळी जिल्ह्यातील 21 फिल्ड ट्रेनर उपस्थित होते.

यावेळी डिजिटल जनगणना होणार आहे. या जनगणनेमध्ये मोबाइल ॲपचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांना 34 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. जनगणनेची संपूर्ण माहिती व संकलन सी एम एम एस पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. जनगणना दोन टप्प्यांत पडणार आहे . पहिला टप्पा घरी यादी व घरगणना आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना होणार आहे.

सर्व नागरिकांना एक मे ते पंधरा मे 2026 या कालावधीत स्वगणनेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व नागरिक या कालावधीत स्वगणना करतील. त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 पर्यंत प्रगनत घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. यावेळी प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे.

प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून जिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. फिल्ड ट्रेनर प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील पर्यवेक्षक व प्रगणक यांना प्रशिक्षण देतील. प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande