अक्षय्य तृतीयेला बालविवाह; होणार थेट तुरुंगवास
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी १९ एप्रिल जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बालविवाह लावल्यास कारावासाची कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बाल व
अक्षय्य तृतीयेला बालविवाह; थेट तुरुंगवास


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी १९ एप्रिल जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बालविवाह लावल्यास कारावासाची कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बाल विवाहासाठी जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातर्फे शहर, ग्रामीण भागात मोहिम राबवली जात आहे. बालविवाह सामाजिक कुझ्या नसून, तो गंभीर, दखलपात्र गुन्हा आहे, याची जाणीव समाजात निर्माण करण्यासाठी ही मोहिम राबवणार आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार १८वर्षांखालील मुलगी, २९ वर्षांखालील मुलगा अशा विवाहात सहभागी होणारे पालक, यांचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा आहे. आयोजक, भटजी (गुरुजी), इतर सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणार आहे. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, शाळा प्रशासन, स्वयंसेवी संस्थांच्या समक्यातून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागात प्रशासनाने यंत्रणेला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्प लाइन १७९८ वर संपर्क साधावा किंवा प्रशासनाला कळवावे, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी दिली,अनेकजण घेतात शुभमुहूर्ताचा गैरफायदा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असून, या दिवशी विवाह रुढीवादी लोक, अज्ञान व अंधश्रद्धेमुळे बालविवाह करतात. अनेक विवाह होत असताना याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही, अशा भ्रामक समजुतीत ते वावरतात. काहीतर मुलीचे व मुलाचे वयच माहिती नव्हते, असा आव आणतात. अशांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बालविवाहाबाबत प्रथमच कठोर पाऊल उचलले असून, संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande