परभणी - शासकीय बालगृहातील मुलांनी अनुभवला योगाचा आनंद
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. योग अभ्यासकेंद्रांतर्गत निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र यांच्या तर्फे शासकीय बालगृहातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत योग शिबिर उत्साहात संपन्न झाले. वसमत र
अ


परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. योग अभ्यासकेंद्रांतर्गत निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र यांच्या तर्फे शासकीय बालगृहातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत योग शिबिर उत्साहात संपन्न झाले. वसमत रोडवरील राजेंद्र गिरीनगर येथील शासकीय बालगृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध योगप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे संयोजक डॉ. अनिल रामपूरकरआणि सहशिक्षिका सौ. वर्षा रामपूरकर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने खालील विषयांचे मार्गदर्शन केले शरीराची लवचिकता आणि मजबुती वाढवणारी विविध आसने.

श्वसनावर नियंत्रण आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी.

मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष सराव.

मुलांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी विविध खेळांचे आयोजन.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून परभणीतील ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. अनिल दिवाण आणि केंद्रप्रमुख डॉ. सौ. शुभदा दिवाणउपस्थित होत्या. डॉ. अनिल दिवाण यांनी आपल्या मार्गदर्शनात लहान वयात योगाचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ. शुभदा दिवाण यांनी मुलांच्या उत्साहाचे कौतुक केले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande