छ. संभाजीनगर - लासूरगाव येथे श्री देवी दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)।शिवना नदीच्या तीरावर वसलेली मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेची यात्रा उत्साहात साजरी होत आहे. मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी कडक उन्हातही अलोट गर्दी केली होती. ''उदे गं दाक्षायणी उदे''च्या जयघ
छ. संभाजीनगर - लासूरगाव येथे श्री देवी दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी


छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)।शिवना नदीच्या तीरावर वसलेली मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेची यात्रा उत्साहात साजरी होत आहे. मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी कडक उन्हातही अलोट गर्दी केली होती. 'उदे गं दाक्षायणी उदे'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

'माता नवसाला पावते', अशी श्रद्धा असल्याने, विविध भागांतून भाविक आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येत आहेत. अनेक भाविकांनी नवसपूर्तीसाठी पायरीवर नारळ फोडले, तर काहींनी जाळातून रहाट खेळणे व दंडवत घालत आपली श्रद्धा अर्पण केली.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली आहेत. यात खेळणी, हार फुले, प्रसादासह संसारोपयोगी वस्तू, रसवंती आणि भोजनलयांचा समावेश आहे. बच्चे कंपनी रहाट पाळण्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा परिश्रम घेत आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande