नांदेड जिल्हा बँक निवडणूक : गजानन अनंतवार यांची निवड
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या अधिकारासाठी आवश्यक ठराव प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सेक्रेटरी सुनील आनेराव, गजानन कदम व जनार्दन धोंगडे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. कवाना सोसायटी
नांदेड जिल्हा बँक निवडणूक : गजानन अनंतवार यांची निवड


नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या अधिकारासाठी आवश्यक ठराव प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सेक्रेटरी सुनील आनेराव, गजानन कदम व जनार्दन धोंगडे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.

कवाना सोसायटीसाठी शिवसेना सर्कलप्रमुख गजानन अनंतवार यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी चेअरमन अॅड. मुरलीधर ढाके, व्हाईस चेअरमन रामभाऊ इंगळे, मारोतराव चेपुरवार, नागोराव अंबोरे, भारत कापसे, बंडू महाराज, भिकाजीराव सूर्यवंशी, विकास प्रधान, उल्हास राठोड, सरस्वतीबाई नामदेवराव सुरोसे, विमलबाई तोडकर यांच्यासह सचिव सुनील आनेराव उपस्थित होते. या ठराव प्रक्रियेत विकासराव मालीवाल (मनाठा), बडू पाटील मिराशे (तांलग), गोविंद इजळकर (बरडशेवाळा), गजानन अनंतवार (कवाना), विलासराव मस्के (पळसा), बेबीताई पंजाबराव तांबारे (गारगव्हान), संदीप सुभाषराव राठोड (किन्हाळा), रामराव जयराम आडे (पांगरी), पार्वतीबाई डिगांबर धुमाळे (खरबी), सीताराम भुरके (चोरंबा खु.), सुभाषराव एकलारे (माळ सावरगाव), प्रशांत हरीभाऊ बागल (शिबदरा), शोभा सुनील आनेराव (करमोडी), सुरेखाबाई विलासराव व्यवहारे (चिंचगव्हान), तुकाबाई तुकाराम नाईक (माळझरा), प्रभाकर देशमुख (उंचाडा), अशोकराव कदम (मार्लेगाव), अमोल वाकोडे पाटील (पिंपरखेड) यांची सोसायटी निवडणूक अधिकारासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande