
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणी विविध नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही या प्रकरणात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोपीची सुनावणी नको, थेट 'एन्काऊंटर' केला पाहिजे, असे विधान केले आहे. त्याची चर्चा आता समाज माध्यमांमध्ये रंगली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, परतवाडा येथील प्रकरणात जे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत, त्यात सर्व हिदू मुली दिसत आहेत. हे सर्व संतापजनक आहे. विरोधक नेहमी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख करतात. पण, हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे याला धर्मनिरपेक्ष म्हणणे योग्य नाही. मुस्लीम महिला बुरखा घालून मतदानाला जातात, त्यांची ओळख पटवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यांचा चेहरा दाखवला जात नाही. हिंदूंवर मात्र सर्व बंधने आहेत. या प्रकरणातील आरोपीचे कृत्य हे संताप आणणारे आहे. त्याचा खरे तर एन्काऊंटर केला पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांचे नागरकित्व रद्द करून त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. त्यांची भारतात राहण्याची लायकी नसल्याचे ही नवनीत राणा म्हणाल्यात.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी