दहावीच्या निकालात नाशिकच्या ‘एकलव्य स्कूल’ची बाजी
राज्यातील तब्बल १० शाळांचा १०० टक्के निकाल नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. या निकालात राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अर्थात ‘ईएमआरएस’ च्या व
दहावीच्या निकालात नाशिकच्या ‘एकलव्य स्कूल’ची बाजी


राज्यातील तब्बल १० शाळांचा १०० टक्के निकाल

नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)।

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. या निकालात राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अर्थात ‘ईएमआरएस’ च्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. तब्बल १० एकलव्य शाळांनी १०० टक्के निकालाची नोंद करत निकालात बाजी मारली आहे.

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी (नाशिक) मार्फत महाराष्ट्रात ३७ एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल चालविल्या जातात. राज्यातील ३१ शाळांचे १ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १ हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ हजार ३७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा ८९.१० टक्के विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. १० एकलव्य शाळांनी १०० टक्के निकाल लागला आहे. त्यात चणकापूर, शिंदेदिगर, पिंपळनेर, शेंडेगाव, सावणे, चिखलदरा, खैरीपरसोडा, बोरगाव बाजार, चामोर्शी, अहेरी या एकलव्य स्कूलचा समावेश आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात १.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२५ मध्ये ८७.९१ टक्के इतका इयत्ता दहावीचा निकाल होता. दरम्यान, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सर्व प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

अल्केश बागुल राज्यात प्रथम

चणकापूर ‘ईएमआरएस’चा विद्यार्थी अल्केश रामचंद्र बागुल याने ९४.८ टक्के गुणांसह राज्यात प्रथम तर कुणाल भिवराज बागुलने ९३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकविला. सावणे ‘ईएमआरएस’चा सचिन लक्ष्मण वळवीला ९२ टक्के गुणांसह तृतीय तर पिंप्रीसदो ‘ईएमआरएस’च्या शौर्या रविंद्र जदे हिला ८९.८ टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळाला. संदीप तुकाराम चौधरी हा ८८.२ टक्के गुणांसह पाचव्या स्थानी राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande