
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड शहरात 'अग्निशमन सेवा सप्ताहा'चा प्रारंभ झाला. नांदेड वाघाळा महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातर्फे मुख्य अग्निशमन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हुतात्मा जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर दीपकसिंग रावत, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे आदी उपस्थित होते. उपअग्निशमन अधिकारी नीलेश कांबळे यांनी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना वर्षभरात २०० आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली. अत्याधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धता व मनुष्यबळातील अडचणीही त्यांनी मांडल्या.
त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. विभागाला लवकरच अत्याधुनिक साहित्य व प्रॉक्झिमिटी सूट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महापौर मुळे यांनी सांगितले. आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी कंत्राटी जवानांनाही अपघाताच्या प्रसंगी एक कोटीचे विमा संरक्षण देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis