
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। राहेर आरळी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या. आगीत चार हजार कडब्याच्या पेंढ्या भस्म झाल्याने शेतकऱ्याचे ६० हजारांचे नुकसान झाले. आरळी येथील शेतकरी यांनी जनावरांसाठी घरासमोरील मोकळ्या जागेत टाळकी कडब्याची गंजी रचली होती. वीजपुरवठ्यात बिघाड होऊन प्लास्टिक वायरद्वारे होत असलेल्या जोडणीत दोन फेज एकत्र आल्याने शॉर्टसर्किट झाले. घटनेचा पंचनामा तलाठी यांनी केला. यावेळी आकाश पोलिस पाटील, सदाशिव पाटील, बापूराव डोणगावे, गौस शेख, मौला शेख, श्रीनिवास डोणगावे उपस्थित होते.
लोहा तालुक्यातील परसरामतांडा शिवारात असलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून पुरवठा होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या खांबावर शॉर्टसर्किट झाले. या आगीत शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजी, जळतण, शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलास पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis