
डोंबिवली, 16 एप्रिल, (हिं.स.)। शिवसेनेकडून पक्ष संघटना बळकटीकरण करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. संघटनात्मक पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण डोंबिवली तालुकाप्रमुख पदी शिवसेनेचे नगरसेवक गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी गजानन पाटील यांची कल्याण ग्रामीण ( डोंबिवली) तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi