डोंबिवलीतील सीबीएसई दहावी निकालात होली एंजल्स स्कूलचा सलग २० वा शंभर टक्के यशाचा विक्रम
डोंबिवली, 16 एप्रिल (हिं.स.)। येथील होली एंजल्स स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई दहावी परीक्षा २०२६ मध्ये सलग २० व्या वर्षी १००% निकालाचा मानाचा तुरा रोवला आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या या निकाला
Photo1


डोंबिवली, 16 एप्रिल (हिं.स.)।

येथील होली एंजल्स स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई दहावी परीक्षा २०२६ मध्ये सलग २० व्या वर्षी १००% निकालाचा मानाचा तुरा रोवला आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या या निकालाने शाळेच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. यंदाच्या परीक्षेत एकूण १५७ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या परीक्षेत जय तुषार भरांबे (९७.२०%) याने प्रथम क्रमांक, दक्ष गणेश पाटील (९७ %) याने द्वितीय क्रमांक, तर प्रणील उमेश म्हात्रे (९६.००%) आणि अँजेलिन रिचर्ड नेय्यन (९६ %) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. विषयानुसारही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, इंग्रजी आणि मराठी विषयांमध्ये प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष उल्लेखनीय

यश मिळवले आहे.

मराठी विषयात पुढील विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवलेः

प्रणील म्हात्रे, अश्लेष हांडे आणि ध्रुव चौधरी.

इंग्रजी विषयात पुढील विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले:

अँजेलिन नेय्यन,अद्वैत मेनन आणि अयान आंजर्लेकर

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande