येलदरी कॅम्पमध्ये मारहाणीतील जखमीचा मृत्यू; किरकोळ वादातून घडली घटना
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येलदरी कॅम्पमध्ये मारहाणीतील जखमीचा मृत्यू; किरकोळ वादातून घडली घटना


परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।

जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, . या घटनेप्रकरणी त्यांची मुलगी स्नेहा हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपी यांच्यावर हल्ला केला. दारू पिण्यासाठी 50 रुपये मागितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी आरोपी याने लोखंडी रॉडने डोक्यावर व तोंडावर वार करून गंभीर जखमी केले, तर इतर दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

जखमी अवस्थेत असलेल्या यांना आरोपींनीच जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून अपघात झाल्याची खोटी माहिती दिली. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दखलपात्र क्र. 215/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल करत आहेत.

मदत करणार्यांनाही सहआरोपी केल्याने संताप...

येलदरी कॅम्प येथे झालेल्या या घटनेत गंभीर जखमी रणखांब यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणार्यांना सहआरोपी करून अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच गावात संतापाची भावना व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande