कन्नड नक्शा प्रकल्प टप्पा क्रमांक १ मिळकत नकाशे,धारक हक्क अंतिम;दि.२३ पूर्वी हरकती मागविल्या
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)। कन्नड नगरपरिषद हद्दीत राबविण्यात आलेल्या नक्शा पथदर्शी प्रकल्पाचे टप्पा १ चे काम पूर्ण झाले आहे. गावठाण क्षेत्रातील प्रारुप अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासंदर्भात संबंधित नागरिकांनी अवलोकन करुन आ
कन्नड नक्शा प्रकल्प टप्पा क्रमांक १ मिळकत नकाशे,धारक हक्क अंतिम;दि.२३ पूर्वी हरकती मागविल्या


छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)।

कन्नड नगरपरिषद हद्दीत राबविण्यात आलेल्या नक्शा पथदर्शी प्रकल्पाचे टप्पा १ चे काम पूर्ण झाले आहे. गावठाण क्षेत्रातील प्रारुप अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासंदर्भात संबंधित नागरिकांनी अवलोकन करुन आपल्या हरकती व सुचना दि.२३ पुर्वी नोंदवाव्या आवाहन उपधीक्षक भूमि अभिलेख कन्नड कैलास निसाळ यांनी केले आहे.

भूमि संसाधन विभाग, ग्रामिण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागाच्या वतीने शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील मुळ व विस्तारीत भागाचे नगरभूमापन करण्यासाठी पथदर्शी स्वरुपात नक्शा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कन्नड नगरपरिषद हद्दीतील क्षेत्रात नगरभूमापन करण्याचा नक्शा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यातील टप्पा क्रमांक १ मध्ये नगर परिषद हद्दीतील गावठाण क्षेत्रातील प्रारुप अंतिम चौकशी नोंदवही आणि प्रारुप अंतिम नकाशा ऑनलाईन तसेच नगरपालिका कन्नड कार्यालय, तहसील कार्यालय कन्नड व उपअधीक्षक भूमि अभिलेख कन्नड कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे. कन्नड शहरातील सर्व संबंधीत नागरिकांनी ही प्रारुपे पाहून अंतिम चौकशी नोंदवही आणि प्रारुप अंतिम नकाशा यांचे अवलोकन करावे व त्याबाबत खात्री करावी. नागरिकांना त्यांच्या मिळकतीबाबत तयार करण्यात आलेल्या अभिलेखांबाबत काही दुरुस्ती सुचवायची असल्यास किंवा हरकत नोंदवावयाची असल्यास ती पुराव्याच्या कागदपत्रांसह उपअधीक्षक भूमि अभिलेख, कन्नड कार्यालयात गुरुवार दि.२३ पर्यंत लेखी स्वरुपात नोंदवावी. अथवा https://svamitva.mahabhumi.gov.in.cses/_singup वर नोंदवावी,असे आवाहन उपधीक्षक भूमि अभिलेख कन्नड कैलास निसाळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande