परभणीत नारी शक्तीचा उत्साह; बाईक रॅली व पदयात्रेत महिलांचा मोठा सहभाग
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ परभणी शहरात भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध भागांतून महिलांनी मोठ्या संख्येने
Q


परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ परभणी शहरात भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली.

या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध भागांतून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाईक रॅलीत महिला स्वतः वाहन चालवत सहभागी झाल्या, तर पदयात्रेतही उत्साहाने घोषणाबाजी करत त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांना विधिमंडळ सभागृहात ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. महिला या केवळ लाभार्थी न राहता या देशाच्या धोरणकर्त्या व्हाव्यात, यासाठी प्रधानमंत्री यांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

शहरातील शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वसमत रोड, परभणी या मार्गावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान “महिला सशक्तीकरण” या संदर्भातील संदेश देण्यात आले. महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत, हा केवळ कार्यक्रम नसून बदलाची सुरुवात असल्याचे दाखवून दिले. एकूणच, ही बाईक रॅली आणि पदयात्रा महिलांच्या एकजुटीचे, आत्मविश्वासाचे आणि सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलाचे प्रतीक ठरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande