आरोग्य विद्यापीठाच्या एम.एस्सी. फार्मास्युटिकल पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.) - विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरणारे ’एम. एस्सी. इन फार्मास्युटिकल मेडिसिन’ या दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षाच्या
MUHS


नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.) - विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरणारे ’एम. एस्सी. इन फार्मास्युटिकल मेडिसिन’ या दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १८ मे २०२६ आहे.

आरोग्य विज्ञान क्षेत्रातील पदवीधरांसाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम पूर्णत क्रेडिट-बेस्ड आणि कौशल्यावर आधारित असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हॅास्पिटल आणि फार्मा उद्योगातील अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते. यामध्ये क्लिनिकल रिसर्च, फार्माकोव्हिजिलन्स आणि औषध निर्मितीच्या आधुनिक तंत्रांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी युनिव्हर्सिटी ग्रॅंड कमिशनची मान्यता आहे. विद्यापीठाचा पहिलाच अशा प्रकारचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. जागतिक स्तरावर फार्मा क्षेत्रात मोठया प्रमाणात तज्ज्ञांची गरज आहे ही गरज ओळखून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आरोग्य शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्याना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.

या प्रवेश प्रक्रियेसाठी, एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.पी.टी.ए., बी.पी.ओ., बी.ए.एस.एल.पी., पी.बी.बी.एस.सी. नर्सिंग, बी.एस्सी नर्सिंग आणि बी. एस्सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी यांसारख्या आरोग्य विज्ञान शाखांतील पदवीधर, बी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थी आणि लाइफ सायन्स (बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॅाजी, बॅाटनी, झुलॅाजी, केमिस्ट्री, फिजिओलॅाजी, फार्माकोलॉजी आणि बायोटेक्नाॅलाॅजी.) या विषयातील पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत. या अभ्यासक्रमासाठी दि.७ जून २०२६ रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण ६० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, राज्य सरकारच्या नियमांनुसार आरक्षण आणि शिष्यवृत्तीचा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औषधनिर्माण आणि संशोधन क्षेत्रात पुढीलप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. फार्मास्युटिकल इंडस्ट्री व रिसर्च, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल ट्रायल्स, रिसर्च ऑड डेव्हलपमेंट सेंटर, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, फार्माकोव्हिजिलन्स, मेडिकल रायटिंग, मार्केट रिसर्च आणि फोरकास्टिंग, फार्मा बायोटेक बिझनेस एसेन्शियल्स, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आणि एथिक्स कमिटी यामध्ये मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा dpm@muhs.ac.in या ईमेलवर किंवा (०२५३) ६६५९३०१, ६६५९३३६ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande