शेती फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री ८ किंवा १० वाजेपर्यंत बंद ठेवला
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी शेती फिडरवरील सिंगल फेजवर कृषिपंप जोडत आहेत. त्यामुळे ‘महावितरण’कडून अशा शेती फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री ८ किंवा १० वाजेपर्यंत
mahavitran


सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।

वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी शेती फिडरवरील सिंगल फेजवर कृषिपंप जोडत आहेत. त्यामुळे ‘महावितरण’कडून अशा शेती फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री ८ किंवा १० वाजेपर्यंत बंद ठेवला जात आहे.

सोलापूर शहरात सव्वादोन लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. त्यांना दरमहा सरासरी ४८ मिलियन युनिट वीज लागते. मात्र, आता हा वापर ५६ मिलियन युनिटपर्यंत (५६० लाख युनिट) पोहोचला आहे. शहरात आठवड्यातून दोनदा नळाला पिण्यासाठी पाणी येते, त्यावेळी बहुतेक ठिकाणी नळाला इलेक्ट्रिक मोटार लावली जाते. दुसरीकडे, सोलापूर ग्रामीणमध्ये सव्वानऊ लाख वीजग्राहक असून, त्यापैकी साडेसहा लाखांपर्यंत घरगुती ग्राहक आहेत. ग्रामीण भागात दररोज सरासरी १२६० मेगावॉट विजेचा वापर होत आहे, जो उन्हाळ्यापूर्वी १२०० मेगावॉटपर्यंत होता.

दरम्यान, तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने शेतीपंपासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जात आहे. त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषीपंप जोडत असल्याने त्या फिडरवरील अपेक्षित लोड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लोडशेडिंग नसले तरी त्या फीडरवरील वीजपुरवठा सायंकाळी सहा ते रात्री आठ-दहा वाजेपर्यंत बंद ठेवला जात असल्याची माहिती ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande