लातूर - मुंदडा अल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग ; दोघे गंभीर भाजले
लातूर, 16 एप्रिल (हिं.स.)। : जुनी एमआयडीसी परिसरातील ''मुंदडा इंडस्ट्रीज'' (काच कारखाना)ला गुरूवारी भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे. तर या आगीत ३ कर्मचारी होरपळले असून त्यांना प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आ
फॅक्टरीत आग


लातूर, 16 एप्रिल (हिं.स.)।

: जुनी एमआयडीसी परिसरातील

'मुंदडा इंडस्ट्रीज' (काच कारखाना)ला गुरूवारी भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे. तर या आगीत ३ कर्मचारी होरपळले असून त्यांना प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून २५ ते ३० गॅस सिलिंडर्सला आग नियंत्रण पथकातील जवानांनी इतरत्र सुरक्षीत हलविले. दरम्यान या आगीत तीन ते ४ स्फोट झाले असून ते गॅस सिलिंडरचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande