नांदेड - प्रमोद देशमुख यांचा कृषिमंत्र्यांकडून कृषि सन्मानाने गौरव
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांना कृषि सन्मान २०२६ चा उत्कृष्ट माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी संघटना शासकीय कृषि महाविद्यालय पुणे यांच्या ३८ व्या वर्धापन दिनी पुणे येथे
नांदेड - प्रमोद देशमुख यांचा कृषिमंत्र्यांकडून कृषि सन्मानाने गौरव


नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांना कृषि सन्मान २०२६ चा उत्कृष्ट माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी संघटना शासकीय कृषि महाविद्यालय पुणे यांच्या ३८ व्या वर्धापन दिनी पुणे येथे हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मागील १५ वर्षांपासून संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कृषि शास्त्रज्ञांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवून, त्यांच्या शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेषतः सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

या कार्यक्रमाला डॉ. विलास खर्चे (कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारताचा आर्थिक विकास आणि कृषी समस्या या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देऊन कार्यक्रमाला वैचारिक दिशा दिली. पुणे येथील शासकीय कृषि महाविद्यालय मधील डॉ. शिरनामे सभागृहात पार पडलेल्या या समारंभात २०२६ चा 'कृषी जीवनगौरव पुरस्कार' सुरेश खोपडे यांना प्रदान करण्यात आला. प्रमोद देशमुख हे याच कृषि महाविद्यालयाचे अभिमानास्पद माजी विद्यार्थी असून, त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला आहे. प्रमोद देशमुख व पत्नी सुनंदाताई यांच्यासह हा पुरस्कार स्विकारला असून, हा पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande