
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। महात्मा बसवेश्वर यांची जयंती येत्या ५ मे रोजी कंधार शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी येथील सेवा जनसंपर्क कार्यालयात प्रा. मनोहर धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवा संघटनेची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत येत्या ५ मे रोजी होणाऱ्या जयंती महोत्सवाचे उद्घाटन भाजपच्या राज्य उपाध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहेत. तसेच गुरुवर्य शिवाचार्य, विविध राजकीय पदाधिकारी, शिवा संघटना व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मिरवणूक साठेनगर येथून सायंकाळी चारला निघून बालाजी मंदिर येथे समारोप होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
बैठकीत जयंती महोत्सव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी विश्वनाथ किडे, स्वागताध्यक्षपदी नगरसेवक मयूर नळदकर, तर कार्याध्यक्षपदी मधुकरराव मुसळे यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून गंगाधर मंगनाळे, बालाजी भुरे, नामदेव कल्याणकस्तुरे, उपाध्यक्ष म्हणून नाना चिवळे, गजानन बेंद्रे, शिवदास नाईकवाडे, सरचिटणीस म्हणून परमेश्वर पोटजळे, साईनाथ मळगे, सतीश घोडके, चिटणीस म्हणून अर्जुन मुंडे, राम कदम यांची निवड करण्यात आली. मुख्य संघटक म्हणून नामदेव कांबळे, माधव भुरे, माधव डुबुकवाड, संघटक म्हणून विलास आलाबदे, परमेश्वर बोंबले, गोविंदराव येवते, सहकोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत गोंड, शिवराज भोसीकर, त्र्यंबक भोसीकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा. डॉ. गंगाधर तोगरे, मिर्झा जमीर बेग, माधव भालेराव, मोहम्मद सिकंदर, शुभम केंद्रे, विश्वाभर बसवंते, एस. पी. केंद्रे यांची निवड करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis