कोल्हापूर - जिल्ह्यात सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी आढावा बैठक
कोल्हापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात सर्वत्र 28 एप्रिल रोजी हा दिवस ''सेवा हक्क दिन'' म्हणून महसूल विभागातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी एनआयसी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
कोल्हापूर - जिल्ह्यात सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी आढावा बैठक


कोल्हापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात सर्वत्र 28 एप्रिल रोजी हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून महसूल विभागातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी एनआयसी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.

जनसेवा करताना सामान्य नागरिकांसाठी पारदर्शकता,उत्तरदायित्व, कालबद्धता व कार्यक्षमता या बाबी वेळेत साध्य व्हाव्यात या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा बनविण्यात आला आहे.

यावेळी बोलताना गुरव म्हणाले, या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात या अधिनियमाबाबत तसेच राज्यसेवा आयोग आणि आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत नागरिकांनामध्ये जनजागृती करण्यात यावी तसेच हा दिन जन सहभागासह संपूर्ण जिल्हयात तालुका व ग्रामस्तरावर मोठ्या उत्साहात साजरा करावा.

या आढावा बैठकीसाठी सर्वसाधारण तहसीलदार नाथाजी सगट,संदीप पाटील,मिना आनेकर, अनुराधा सोनवणे हे प्रत्यक्ष तर व्हीसीद्वारे जिल्ह्यातील प्रांताधिकारी,तहसीलदार आणि संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande