मी लोकप्रतिनिधी असलो तरी त्याआधी एक भाजपा कार्यकर्ता आहे - आ. देवेंद्र कोठे
सोलापूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। मी लोकप्रतिनिधी असलो तरी त्याआधी एक भाजपा कार्यकर्ता आहे, असे म्हणत आमदार देवेंद्र कोठे यांनी चक्क शेवटच्या रांगेत बसून प्रशिक्षणाचा आनंद घेतला. अक्कलकोट रोड येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या सोलापूर शहर
Kote Devendra


सोलापूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। मी लोकप्रतिनिधी असलो तरी त्याआधी एक भाजपा कार्यकर्ता आहे, असे म्हणत आमदार देवेंद्र कोठे यांनी चक्क शेवटच्या रांगेत बसून प्रशिक्षणाचा आनंद घेतला. अक्कलकोट रोड येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या प्रशिक्षण वर्गात त्यांच्या या साधेपणाची आणि पक्षनिष्ठेची मोठी चर्चा रंगली.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला अंत्योदयाचा मंत्र प्रत्येक कार्यकर्त्यात रुजवणे आवश्यक आहे. अंत्योदय हेच भाजपाच्या कार्याचे अंतिम ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम मंडलाचा प्रशिक्षण वर्ग बुधवारी अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात झाला. या प्रशिक्षण वर्गात दिवसभर विविध सत्रांमध्ये भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षण शिबिरादरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर बसण्याचा आग्रह केला परंतु हा भाजपाचा प्रशिक्षण वर्ग आहे. मी आधी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांसमवेतच बसतो असे संगत आमदार देवेंद्र कोठे यांनी या शिबिरात सगळ्यात शेवटच्या रांगेत बसणे पसंत केले. 'भाजपामध्ये संघटनेला सर्वाधिक महत्त्व आहे. हे आमदार देवेंद्र कोठे यांनी कृतीतून दाखवून दिले, अशा शब्दांत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे कौतुक केले.प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना तसेच भाजपाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सरल ॲप, नमो ऍप, चॅट जीपीटी त्याचबरोबर विविध समाज माध्यमांचा उपयोग करावा. भाजपाचा कार्यकर्ता प्रशिक्षित असेल तर तो अधिक जोमाने पक्षाचे काम करू शकेल या हेतूने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभर यंदाच्यावर्षी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, असेही आमदार श्री. कोठे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande