
सोलापूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा परिषद सोलापूरचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या कुशल जैन यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील तसेच वित्त व लेख अधिकारी मिनाक्षी वाकडे मॅडम उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड