रागाच्या भरात घर सोडलेला बीडचा तरुण पुण्यात सापडला
बीड, 16 एप्रिल (हिं.स.) रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या १८ वर्षीय तरुणाला वडवणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरातून सुखरूप शोधून आणले. एकुलता एक मुलगा घरी परतल्याने मजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी पोलिसांचे मनापासून आभार मानल
रागाच्या भरात घर सोडलेला बीडचा तरुण पुण्यात सापडला


बीड, 16 एप्रिल (हिं.स.)

रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या १८ वर्षीय तरुणाला वडवणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरातून सुखरूप शोधून आणले. एकुलता एक मुलगा घरी परतल्याने मजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले असून, पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील कार्यप्रणालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील हा तरुण काही दिवसांपूर्वी रागाच्या भरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. नातेवाइकांकडे शोध घेऊनही मुलगा सापडत नसल्याने हतबल झालेल्या पालकांनी वडवणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुलगा बेपत्ता झाल्याने आई-वडील अत्यंत काळजीत होते फोन बंद असल्याने तपासात अडथळे येत होते. मात्र, त्याने एकदा सीमकार्ड बदलताच त्याचे लोकेशन शिरूर (पुणे) परिसरात आले. विलंब न लावता पोलिसांनी पुणे गाठले. तेथे तपास करत असताना एका व्यापाऱ्याने तो काम मागायला आल्याची माहिती दिली, तर एका किराणा दुकानदाराने त्याने उधारीवर सामान नेल्याचे सांगितले. दुकानदाराच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला आणि ताब्यात घेतले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande