प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे विशेष गाड्यांच्या फे-यांना मुदतवाढ
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ विशेष गाड्यांच्या फे-याना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व विशेष गाड्या
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे विशेष गाड्यांच्या फे-यांना मुदतवाढ


परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ विशेष गाड्यांच्या फे-याना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व विशेष गाड्या विद्यमान थांबे आणि वेळापत्रकानुसारच धावणार आहेत.

गाडी क्रमांक 07605 तिरुपती-अकोला विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा 17 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07606 अकोला-तिरुपती विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 19 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, गाडी क्रमांक 07015 नांदेड-तिरुचेंनूर विशेष गाडी शनिवारी धावणार असून तिची सेवा 18 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07016 तिरुचेंनूर-नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून ती 19 एप्रिल 2026 पर्यंत चालविण्यात येणार आहे.

याशिवाय, गाडी क्रमांक 07189 नांदेड-धर्मावरम विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा 17 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07190 धर्मावरम-नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून ती 19 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, गाडी क्रमांक 07609 जालना-तिरुचेंनूर विशेष गाडी सोमवारी धावणार असून तिची सेवा 20 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07610 तिरुचेंनूर-जालना विशेष गाडी मंगळवारी धावणार असून ती 21 एप्रिल 2026 पर्यंत धावणार आहे.

प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास नियोजनबद्ध करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande