माजी खासदार व आमदारांची पेन्शन बंद करा ! - माजी आ. राजू पाटील
डोंबिवली, 16 एप्रिल (हिं.स.) माजी खासदार व माजी आमदार यांची पेन्शन बंद करा मनसे माजी आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी ट्वीट करीत त्यांचे मत व्यक्त केले आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या
Photo1


डोंबिवली, 16 एप्रिल (हिं.स.)

माजी खासदार व माजी आमदार यांची पेन्शन बंद करा मनसे माजी आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी ट्वीट करीत त्यांचे मत व्यक्त केले आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेंशन व इतर सुविधांचा भार सुधा भविष्यात वाढतच जाणार आहे. खरंतर माजी खासदार व माजी आमदार (यात मी पण आलो) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी. संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी, असे मनसेचे माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी ट्विट या माध्यमातून सांगितले आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande