परभणीत दहा दिवसीय आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान संचलित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थेच्या वतीने 3 ते 13 मे 2026 या कालावधीत दहा दिवसीय आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा
परभणीत दहा दिवसीय आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन


परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान संचलित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थेच्या वतीने 3 ते 13 मे 2026 या कालावधीत दहा दिवसीय आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येत असून, यावर्षीचे आयोजन विद्याभारती परभणी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण वर्ग गंगाखेड रस्त्यावरील ब्राम्हणगांव परिसरातील राजे संभाजी गुरुकुल येथे पार पडणार आहे. या प्रशिक्षणामध्ये शिशुवाटिका तसेच पूर्व प्राथमिक स्तरावर कार्यरत असलेले सुमारे 200 शिक्षक व आचार्य सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणाच्या दरम्यान वैदिक गणित, कार्यकर्ता प्रशिक्षण तसेच अध्यापक प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रशिक्षण वर्गाच्या अनुषंगाने व्यवस्थापनाची बैठक नुकतीच राजे संभाजी गुरुकुल येथे पार पडली. या बैठकीत विद्याभारतीचे प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी व प्रांत मंत्री दिनेश देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभाग अध्यक्ष देवदत्त देशपांडे, विभाग मंत्री प्रताप देशपांडे, संस्कृती ज्ञान परीक्षा प्रांत सहसंयोजक शिवाजी आरळकर, अभय हट्टेकर, विद्याभारती परभणी जिल्हाध्यक्ष सुभाष चलवदे, जिल्हा मंत्री शिरीष संघई, जिल्हा सहमंत्री संतोष चिद्रवार, चंद्रशेखर कुलकर्णी, विकास येस्के, प्रशांत डाफणे, आदित्य तुंगेनवार, अभिलाषा संघई, कल्पना कांबळे, वनमाला कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गामुळे शिक्षकांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande