माजलगाव पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान संपन्न
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)। पक्ष संघटनेत काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा प्रशिक्षित कार्यकर्ता निर्माण व्हावा व भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम अजून चांगल्या प्रकारे वाढावे या उद्देशाने उद्देशाने संपूर्ण देशभर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्ष
अ


बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।

पक्ष संघटनेत काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा प्रशिक्षित कार्यकर्ता निर्माण व्हावा व भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम अजून चांगल्या प्रकारे वाढावे या उद्देशाने उद्देशाने संपूर्ण देशभर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी माजलगाव शहर मंडळाच्या वतीने श्री सिद्धेश्वर संकुल भारत माता सभागृह येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरास प्रदेश व विभागीय पातळीवरील नेते गण वक्त्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे माजलगावात मोठा नेता नसताना देखील भाजपा माजलगावचे शहर मंडळाध्यक्ष विनायक रत्नपारखी यांनी सर्वांनी आदर्श घ्यावा असे नियोजनबद्ध शिबिर घेऊन प्रदेश भाजपचे व उपस्थित सर्वच नेत्यांचे लक्ष वेधले.

प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, आमदार संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, आयुष्यमान भारतचे ओमप्रकाश शेटे आदींनी विविध विषय मांडत कार्यकर्त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गास वर्ग प्रमुख म्हणून अभय होके पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना संबोधित केले , अभय होके यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम करत या अभियानाचे वर्ग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. या प्रशिक्षण वर्गास उद्घाटक/अध्यक्ष म्हणून भाजपा नेते ज्ञानेश्वर मेंडके व माजी नगराध्यक्ष डॉ.अशोक तिडके होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande