खरीप हंगामाच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज व्हावे; बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखा
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होऊ नये आणि त्यांना आवश्यक सोयीसुविधा वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रशासन स्तरावर जय्यत तयारी करण्याचे निर्देश आमदार नमिता मुंदडा यांनी दिले आहेत. पंचायत समिती केज
Q


बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होऊ नये आणि त्यांना आवश्यक सोयीसुविधा वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रशासन स्तरावर जय्यत तयारी करण्याचे निर्देश आमदार नमिता मुंदडा यांनी दिले आहेत. पंचायत समिती केज येथे आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. भारतीय हवामान विभागाने २०२६ सालासाठी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने, या बैठकीत नियोजनावर विशेष भर देण्यात आला. याप्रसंगी महाडीबीटी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर कृषी साहित्याचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार मुंदडा यांनी स्पष्ट केले की, कमी पावसाच्या शक्यतेमुळे हवामान विभाग आणि जागतिक हवामान संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेरणीचे नियोजन करण्याबाबत गावोगावी प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे. खरीप हंगामात दर्जेदार बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याची खात्री प्रशासनाने करावी. बियाण्यांचा काळाबाजार, अनधिकृत साठा किंवा खतांच्या खरेदीत होणारी लिंकिंगची सक्ती रोखण्यासाठी कृषी विभागाने कठोर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करून, विलंब लावणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande