बीड - दहीफळ येथे वडमाऊली देवीच्या यात्रेला सुरूवात
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)। केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून, ही यात्रा १८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दहीफळ वडमाऊली गावापासून उत्तरेला डोंगराच्या पायथ्याशी वडमाऊली देवीचे मंदिर असून, देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ''
बीड - दहीफळ येथे वडमाऊली देवीच्या यात्रेला सुरूवात


बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।

केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून, ही यात्रा १८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

दहीफळ वडमाऊली गावापासून उत्तरेला डोंगराच्या पायथ्याशी वडमाऊली देवीचे मंदिर असून, देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा प्राप्त झालेला आहे. चैत्र महिन्यात अष्टमीपासून चार दिवस यात्रेचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी सकाळी गावातून देवीच्या मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या

मिरवणुकीत बँड व लेझीम पथक, आराधी मंडळे सहभागी झाली होती. पालखी मिरवणुकीनंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येऊन सुवासिनींची पंगत घालण्यात आली. येत्या शुक्रवार, १७ एप्रिल रोजी रात्री मंदिर परिसरात देवीची छबिना - पालखी मिरवणूक निघणार असून, १८ एप्रिल रोजी यात्रेची सांगता होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande