
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।
परभणी शहरात गुरुवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या सर्व घटनांमध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद देत आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
पहिली घटना सुपर मार्केट रोड परिसरात घडली. येथे खुल्या जागेत साचलेल्या कचर्याला आग लागली होती. त्यानंतर उड्डाण पूल, गंगाखेड नाका परिसरातही कचर्याला आग लागल्याची घटना घडली. तर कृषी कॉलनी येथे घडली. येथे शेख युनूस शेख खाऊम यांच्या पत्र्याच्या शेडला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. या शेडमध्ये एकूण सहा शेळ्या होत्या. दुर्दैवाने आगीमध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला, तर अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन शेळ्यांना वाचविण्यात यश आले. मात्र वाचलेल्या शेळ्या आगीच्या उष्णतेमुळे किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या कारवाईत अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे, फायरमन गौरव देशमुख, सर्जेराव मुंढे तसेच वाहन चालक इनायत अली यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis