
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचे आमदार नमिता मुंदडा यांनी शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांचा आढावा घेताना गोपीनाथ मुंडे अपघात विमा, कृषी सोलर पंप आणि पीक विमा यांसारख्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
खरीप २०२५ चा प्रलंबित विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आणि विमा ट्रिगरमधील बदलांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी आयडीमधील त्रुटी दुरुस्त करणे आणि महाडीबीटी अंतर्गत प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करण्याबाबत त्यांनी यंत्रणेला सतर्क केले.
शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासोबतच पोकरा आणि जलसंधारण योजनांच्या माध्यमातून केळी व रेशीम लागवडीस प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. या बैठकीस नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. सर्व शेतकरी बांधवांना आगामी हंगामासाठी शुभेच्छा देत, प्रशासनाने समन्वयाने काम करावे अशी अपेक्षा आमदार मुंदडा यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis