परभणी - अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त रेल्वे पोस्ट विभागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचा-यंाना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नियंत्रण कसे मिळवावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र अग्नि
क


परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचा-यंाना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नियंत्रण कसे मिळवावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आपत्कालीन प्रसंगी लागलेल्या आगीवर प्राथमिक पातळीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी मॉक ड्रिलद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणावेळी रेल्वे पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी सौ. अर्चना देशपांडे, विठ्ठल मोरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी दिपक कानोडे, फायरमन गौरव देशमुख, निखिल बेंडसुरे, वाहन चालक वाशिम अखिल अहमद यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे कर्मचार्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत जागरूकता वाढून तत्परतेने प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande