नांदेड - 'यू-डायस' धारक शाळांची तीन टप्प्यांत पडताळणी
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व यू-डायस (U-DISE) क्रमांक असलेल्या शाळांची तीन टप्प्यांत पटपडताळणी सुरू असून, शिक्षण विभागाकडून २२ एप्रिल रोजी ही मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची अचूक संख्या, शाळांची नोंद व शैक्षणिक माहिती अद्
नांदेड - 'यू-डायस' धारक शाळांची तीन टप्प्यांत पडताळणी


नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व यू-डायस (U-DISE) क्रमांक असलेल्या शाळांची तीन टप्प्यांत पटपडताळणी सुरू असून, शिक्षण विभागाकडून २२ एप्रिल रोजी ही मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची अचूक संख्या, शाळांची नोंद व शैक्षणिक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण ३७०५ शाळा कार्यरत आहेत. दोन टप्प्यांतील पडताळणीत २४०८ शाळांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित १२९७ शाळांची पडताळणी २२ एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

या पडताळणी प्रक्रियेत शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती, नावनोंदणी, शिक्षकांची संख्या, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेतला जात आहे. यू-डायस प्रणालीद्वारे संकलित होणारी माहिती राज्य व केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणांसाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक शाळेची माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या शाळांची पडताळणी अद्याप बाकी आहे, त्यांनी २२ एप्रिल रोजी नियोजित वेळेत उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande