छ. संभाजीनगर - रानडुकरांच्या हल्ल्यात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल, (हिं.स.)। रानडुकरांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एक तरुण रुग्णालयातून घरी परतत असताना गंभीर जखमी झाल्याची घटना जरंडी माळेगाव पिंपरी रस्त्यावर घडली. महेंद्र मिलिंद पगारे (वय ३२) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांच्यावर र
छ. संभाजीनगर - रानडुकरांच्या हल्ल्यात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल, (हिं.स.)। रानडुकरांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एक तरुण रुग्णालयातून घरी परतत असताना गंभीर जखमी झाल्याची घटना जरंडी माळेगाव पिंपरी रस्त्यावर घडली. महेंद्र मिलिंद पगारे (वय ३२) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जरंडी येथून महेंद्र पगारे हे घरी जाताना नाल्याजवळ पाणी पिण्यासाठी आलेल्या रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात रानडुकरांनी त्यांच्या मांडीचा व हाताचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले. पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांनी आरडाओरडा करून त्यांची सुटका केली आणि रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक शमीन तडवी व वनमजूर गणेश चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

जरंडी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने वन्यप्राणी तृष्णा भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे व रस्त्यांवर धाव घेत आहेत. वनविभागाने पाण्याची सोय केली असली, तरी ती अपुरी पडत असल्याने प्राण्यांचा संचार वाढला आहे. 'जरंडी परिसरात सध्या तीन ते चार अतिरिक्त पाणवठे वाढवण्यात आले असून, त्यात टँकरद्वारे नियमित पाणी टाकले जात आहे,'

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande