बीड : युगप्रवर्तक चषक-2026 बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।“युगप्रवर्तक चषक 2026” या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला असून,यंदाच्या स्पर्धेत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाच्या संघाने शानदार कामगिरी करत चषकावर आपले नाव क
अ


बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।“युगप्रवर्तक चषक 2026” या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला असून,यंदाच्या स्पर्धेत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाच्या संघाने शानदार कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले.ही स्पर्धा यंदा बाराव्या वर्षात पदार्पण करत असून,कर्मचारी वर्गासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. कर्मचारी वर्गातील क्रीडागुणांना वाव देणे, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे आणि एकात्मता दृढ करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.विशेष म्हणजे,या स्पर्धेत केवळ कर्मचारीच सहभागी होत असल्याने तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.यंदाच्या स्पर्धेत शहर व परिसरातील विविध शासकीय व निमशासकीय विभागांतील एकूण सहा संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.संपूर्ण स्पर्धेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या संघाने शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत इम्रान नाईक यांच्या नेतृत्वातील आय.के.एन.या बल्लाढ्य समजल्या जाणाऱ्या संघावार मात केली.आणि विजेतेपद पटकावले.बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पोलीस प्रशासनाच्या संघाला “युगप्रवर्तक चषक 2026” प्रदान करण्यात आला.तसेच स्पर्धेतील सामनाविराचा मान ओंकार थेटे यांनी,बेस्ट बॅटसमन पोलीस निरीक्षण राहुल सूर्यतळ यांनी व बेस्ट बॉलर सचिन मंजुळे यांनी पटकावला.विजेते व उपविजेते संघातील खेळाडूंना ट्रॉफी,सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल राऊत,डॉ.श्रीराम खळगे,जीवन नखाते,अमोल गायकवाड,परमेश्वर पांचाळ,प्रभाकर साळवे,गोरख उघडे व संपूर्ण सामन्याची पंचगिरी अबू शेरा व ढकलू यांनी करून विशेष सहकार्य केले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande