लातूर - मनपाचे १३५ हातपंप, ७१ विद्युत पंप बंद
लातूर, 26 एप्रिल (हिं.स.)। पाणीटंचाई आणि लातूर शहर असे एक समीकरण बनले की, दर दहा-बारा वर्षांतून एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जेव्हा जेव्हा पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ येते तेव्हा लातूर शहर महानगरपालिकेचे हातपंप, विद्युत पंपांच्या पाण्याची
महानगरपालिका


लातूर, 26 एप्रिल (हिं.स.)।

पाणीटंचाई आणि लातूर शहर असे एक समीकरण बनले की, दर दहा-बारा वर्षांतून एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जेव्हा जेव्हा पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ येते तेव्हा लातूर शहर महानगरपालिकेचे हातपंप, विद्युत पंपांच्या पाण्याची गरज गरज पडते. मात्र यंदा पाणीटंचाईचे सावट नसल्याने सद्यःस्थितीत मनपाचे १३५ हातपंप तर ७१ विद्युत पंप बंद अवस्थेत आहेत. ज्या विद्युत पंपांना आणि हातपंपांना बऱ्यापैकी पाणी आहे, त्याचे नियोजनही मनपाने केलेले नाही.

लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा

धरणात १७६.९६३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४४.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातून दररोजचा पाणी उपसा आणि बाष्पीभवनाने पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे लातूर शहराला महिन्यातून चार वेळेस नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना खाजगी विंधन विहिरींवर अवलंबुन राहावे लागत आहे. पाणीटंचाईच्या

काळात नेहमीच लातूरसाठी मदतीला येणारी लातूर शहर महानगरपालिकेची 'मिनी वॉटर सप्लाय' आजही उपयुक्त ठरु शकते.

लातूर शहरात महानगरपालिकेचे एकुण विद्युत पंप १०६२ आहेत. त्यातील ६४ विद्युत पंप कायमस्वरुपी बंद आहेत. ९४७ विद्युत

पंप चालू आहेत. पाण्याअभावी ७१ विद्युत पंप बंद पडलेले आहेत. तर ३० विद्युत पंपांना पाणी अत्यंत कमी आहे. मनपाचे २५४ हातपंप आहेत. त्यापैकी १३५ हातपंत बंद पडलेले आहेत. ११९ हातपंप चालू आहेत. ५० हातपंपांचे पाणी कमी झाले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील 'मिनी वॉटर सप्लाय' म्हणून जी व्यवस्था मनपाने लाखो रुपये खर्च करुन उभी केली आहे ती सक्षम केली तर पाणीटंचाईच्या काळात ही यंत्रणा सहायकारी ठरु शकते.

महानगरपालिकेच्या बहूतांश विंधन विहिरी व विद्युत पंप शहरातील झोपडपट्टी, गोरगरीबांच्या वस्तीमध्ये आहेत.

आठवड्यातून केवळ एक दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा होतो आहे. झोपडपट्टीतील नळांना पाणी येत असले तरी ते पुरेसे मिळत नाही. त्यामुळे त्यांना विद्युत पंप किंवा विंधन विहिरींवरच अलवलंबुन राहावे लागत आहे. बंद पडलेले १३५ हातपंप आणि ७१ विद्युत पंप दुरुस्त केले तर या गोरगरीब नागरिकांच्या पाण्याची सोय होणार आहे. ज्या विद्युत पंपांना व विंधन विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे. त्या पाण्याचे योग्य नियोजन झाले तर भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई कमी करता येणार आहे. याकडे लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande