नांदेड: महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, 29 एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्म
नांदेड: महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश


नांदेड, 29 एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमीत केले आहेत.

या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक, तहसिल कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेध महाविद्यालय तथा शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजीराबाद नांदेड पर्यंतच्या परिसरातील शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 2 मे 2026 च्या 00.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.

संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande