नाशिक - उष्णतेत भक्तीचा गारवा; ‘चंदन यात्रा’ उत्सवानिमित्त श्री कृष्णांना चंदनाचे लेपन
नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। अक्षय्य तृतीयेनंतर उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भगवंतांना थंडावा मिळावा या उद्देशाने ‘चंदन यात्रा’ उत्सव साजरा करण्याची परंपरा वृंदावन व जगन्नाथ पुरी येथे प्राचीन काळापासून जोपासली
A shower of devotion in


नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। अक्षय्य तृतीयेनंतर उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भगवंतांना थंडावा मिळावा या उद्देशाने ‘चंदन यात्रा’ उत्सव साजरा करण्याची परंपरा वृंदावन व जगन्नाथ पुरी येथे प्राचीन काळापासून जोपासली जात आहे. याच परंपरेनुसार जगभरातील इस्कॉन मंदिरांतही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

अक्षय्य तृतीया पासून सुरू होणाऱ्या २१ दिवसीय ‘चंदन यात्रा’ उत्सवानिमित्त आज नाशिक येथील श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात श्रीकृष्णांच्या मुख्य विग्रहांना सुगंधित चंदनाचे लेपन करण्यात आले. या विशेष सेवेमुळे भगवंतांना उन्हाच्या तीव्रतेपासून थंडावा मिळावा, अशी भक्तांनी भावना व्यक्त केली.

दरम्यान, सध्या शहरासह परिसरात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल नाशिकमध्ये या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी ४१.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे नागरिकांसह भाविकांमध्येही उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना वेग आला आहे.

‘चंदन यात्रा’ उत्सव अक्षय्य तृतीया पासून पुढील २१ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन व विशेष पूजा-अर्चनेसह साजरा केला जाणार असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande