रत्नागिरी : गोमातेला राष्ट्रमाता घोषित होण्यासाठी सोमवारी गो-सन्मान पदयात्रा
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर येथे जमून तहसील कार्यालयापर्
गोसन्मान पदयात्रा नियोजन बैठक


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील पतितपावन मंदिर येथे जमून तहसील कार्यालयापर्यंत गो-सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत सर्व व गोभक्त, गोरक्षक, गोप्रेमी हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशभर गो-सन्मान आवाहन अभियान सुरू असून याअनुषंगाने पतितपावन मंदिर येथे झालेल्या बैठकीत वृंदावन येथील गोवत्स योगी श्री जगदीशानंद महाराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गोमाता ही हिंदुस्थानचा प्राण असून आज गोमातेची होणारी उपेक्षा, तिची होणारी कत्तल ही देशाला व हिंदूंना लागलेला कलंक आहे आणि तो मिटवायची वेळ आली आहे. यासाठी गोमातेला राष्ट्रमाता घोषित केल्याशिवाय, तिला संरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट होऊन गोमातेला राष्ट्रामातेचा दर्जा देण्यासाठी गो-सन्मान पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे.

गोमातेच्या संरक्षणासाठी गोपालन मंत्रालयाची स्थापना व्हावी, तसेच शेतकरी, गोशाळा यांना गोवंशाची देखभाल करण्यासाठी अनुदान मिळून गोमातांना संरक्षण मिळावे, गोमाता राष्ट्रमाता होणे आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या अभियानासाठी स्वाक्षरी मोहिम सुरू आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande