डोंबिवली - आगरी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य
डोंबिवली, 26 एप्रिल (हिं.स.)। आगरी युथ फोरम डोंबिवली यांच्या माध्यमातून लोढा चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान सोहळा रविवारी २६ एप्रिल रोजी डोंबिवली जवळील निळजे येथील लोढा कासा बेला येथील एक्सपिरिया मॉल य
Photo1


डोंबिवली, 26 एप्रिल (हिं.स.)। आगरी युथ फोरम डोंबिवली यांच्या माध्यमातून लोढा चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान सोहळा रविवारी २६ एप्रिल रोजी डोंबिवली जवळील निळजे येथील लोढा कासा बेला येथील एक्सपिरिया मॉल येथे पार पडला. यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय मंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंत्री लोढा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यक देण्यात आले.

यावेळी आचार्य प्रल्हादशास्त्री महाराज,आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, आमदार राजेश मोरे, माजी मैत्री व भाजपा नेते जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, उपाध्यक्ष शरद पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, खजिनदार पाडुरंग म्हात्रे, भास्कर पाटील ( सोनारपाडा ), चंद्रकांत पाटील ( काटई ), गजानन मंगरुळकर ( घेसर), डॉ.दिनेश म्हात्रे, गुरुनाथ म्हात्रे, नगरसेवक गजानन पाटील, जलिंदर पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, यावेळी जरी ७५ विद्यार्थ्यांना हि आर्थिक सहाय्य मदत दिली असली तरी पुढील वर्षीपासून १०० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल. पुढे विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असून यात आगरी युथ फोरमला पन्नास टक्के राखीव राहील असेही मंत्री लोढा म्हणाले.

आगरी युथ फोरमचे विध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे होतकरू विद्यार्थ्यांना १० हजार रुपये मदत म्हणून दिली आहे. लोढा चॅरीटेबल ट्रस्ट यासाठी मोठी आर्थिक मदत केली. आगरी युथ फोरमच्या स्थापनेमागील उद्देश होता आगरी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांने उच्चशिक्षित व्हायला पाहिजे. आणि आता तो उद्देश सफल झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात आगरी विद्यार्थ्याने मजल मारली आहे.

यावेळी आमदार राजेश मोरे यांनीही आगरी युथ फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करून समाजासाठी फोरम सतत कार्यरत आहे असे सांगून काही घटनांचा उल्लेख केला. तर ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, विद्यार्थ्यांना मदत मिळाली हा मोठा आनंद आहे. भविष्यात हेच विद्यार्थी समाजाचे नाव शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर सर्व क्षेत्रात नाव मोठे करतील. दरम्यान आचार्य प्रल्हादशास्त्री महाराज व माजीमंत्री जगन्नाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

-----

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande