मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापौर सय्यद इकबाल यांचा सत्कार
परभणी, 26 एप्रिल (हिं.स.)। शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबई येथे आयोजित परभणी लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईतील श
सत्कार


परभणी, 26 एप्रिल (हिं.स.)।

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबई येथे आयोजित परभणी लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबईतील शिवसेना भवन येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी परभणी महानगरपालिकेचा कारभार प्रभावीपणे चालवित सर्वधर्मसमभाव जपत नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक करत विशेष गौरव केला. महानगरपालिकेतील विविध सभापतींची बिनविरोध निवड घडवून आणल्याबद्दलही महापौर सय्यद इकबाल यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बैठकीस विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील, कल्याणराव रेंगे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अंबिका डहाळे, बदर चाऊस, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande