बीड - विमुक्त-भटक्या जमाती समाजाच्या योजनांना गती; जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
बीड, 26 एप्रिल, (हिं.स.)। विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. विविध विभागांकडून राब
बीड - विमुक्त-भटक्या जमाती समाजाच्या योजनांना गती; जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा


बीड, 26 एप्रिल, (हिं.स.)। विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. विविध विभागांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांना गती मिळत असल्याचे यातून समोर आले.

या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे तसेच विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात येत आहे. आतापर्यंत किती नागरिकांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोचला, याचा आढावा घेत योजनांना अधिक गती देण्याची सूचना जॉन्सन यांनी यावेळी केली. वंचित नागरिकांपर्यंत या योजनांचा अधिक प्रभावीपणे लाभ पोचावा, यासाठी शिबिरांच्या आयोजनात आणखी सुलभता आणण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, इतर बहुजन मागास कल्याण विभागाचे सहसंचालक डी. बी. क्षीरसागर, आदी यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande