उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घ्या; लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन
लातूर, 26 एप्रिल (हिं.स.)। सध्या वातावरणातील बदलांमुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून मार्चपासूनच राज्यातील अनेक भागांत कडक उन्हाचा प्रभाव जाणवत आहे. एप्रिल-मे महिन्यांत सन बर्न, हिट क्रॅम्प्स, हिट एक्झॉर्शन आणि उष्माघात यांसारख्या आजारांचा धोका व
उन्हाळ्याची काळजी


लातूर, 26 एप्रिल (हिं.स.)। सध्या वातावरणातील बदलांमुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून मार्चपासूनच राज्यातील अनेक भागांत कडक उन्हाचा प्रभाव जाणवत आहे. एप्रिल-मे महिन्यांत सन बर्न, हिट क्रॅम्प्स, हिट एक्झॉर्शन आणि उष्माघात यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

धोक्यात कोण?

उन्हात काम करणारे मजूर, वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, स्थूल व्यक्ती तसेच मधुमेह, हृदयविकार असलेले रुग्ण यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो.

लक्षणे ओळखा

थकवा, चक्कर, ताप

अंगावर पुरळ, गोळे येणे

तीव्र डोकेदुखी, त्वचा गरम व कोरडी

नाडी वेगाने धडधडणे, बेशुद्धावस्था

काय करावे?

भरपूर पाणी प्या

सैल, फिकट रंगाचे सुती कपडे वापरा

छत्री, टोपी, गॉगल वापरा

ओआरएस, लिंबूपाणी घ्या

काय टाळावे?

दुपारी उन्हात बाहेर पडणे, कष्टाची कामे करणे, मद्य, चहा-कॉफी, शीतपेयांचे अतिसेवन, लहान मुलांना बंद वाहनात ठेवणे

उष्माघात झाल्यास

रुग्णाला थंड जागी हलवा, थंड पाण्याने शरीर थंड करा, तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्या

प्रशासन सज्ज

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले असून औषधसाठा, पंखे, कुलर व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृतीही सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande