बीड - जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी
बीड, 26 एप्रिल (हिं.स.)। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. अतिदक्षता विभागातील उपकरणे, उपलब्ध उपचार सुविधांची त्यांनी पाहणी करून विविध सूचना दिल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यां
बीड - जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी


बीड, 26 एप्रिल (हिं.स.)। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. अतिदक्षता विभागातील उपकरणे, उपलब्ध उपचार सुविधांची त्यांनी पाहणी करून विविध सूचना दिल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयात माता व बालसंगोपन रुग्णालय इमारतीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे करून ही इमारत कार्यान्वित करणे आणि

रुग्णालयातील सद्यःस्थितीतील उपलब्ध यंत्रणा, अतिदक्षता विभागातील उपकरणे व उपचार याबाबत आढावा घेण्याच्या अनुषंगाने विवेक जॉन्सन यांनी भेट देऊन पाहणी केली.

कायम बंद पडलेली उपकरणे स्टोअरमध्ये ठेवावीत, तसेच दुरुस्तीची गरज असलेल्या उपकरणांची दुरुस्ती करून तत्काळ कार्यान्वित करावीत. अतिदक्षता विभागातील सर्व वातानुकूलित यंत्रे तत्काळ सुरू करावीत, रुग्णांच्या उपचारात आणि सुविधांत अजिबात निष्काळजीपणा होता कामा नये, अशा सूचना यावेळी विवेक जॉन्सन यांनी दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande