कै. अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार पद्मभूषण दिवंगत माधवराव धनंजयराव गाडगीळ यांना प्रदान
सातारा, 26 एप्रिल (हिं.स.)। युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट'' तर्फे देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार पद्मभूषण दिवंगत माधवराव धनंजयराव गाडगीळ यां
सातारा


सातारा, 26 एप्रिल (हिं.स.)। युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट' तर्फे देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार पद्मभूषण दिवंगत माधवराव धनंजयराव गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार त्यांची कन्या सौ. गीता शहा यांचेकडे सुपूर्त करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख व सन्मान चिन्ह असे आहे.

पद्मभूषण दिवंगत माधवराव धनंजयराव गाडगीळ हळे भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक आणि पर्यावरण विज्ञान केंद्राचे संस्थापक होते. त्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरणीय इतिहास या क्षेत्रात व्यापक संशोधन केले होते. भारतात पर्यावरणशास्त्र आणि प्राण्यांच्या वर्तनाच्या परिमाणात्मक तपासणीची ओळख करून देण्याचे आणि मानवांना परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून समाविष्ट करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. १९८० च्या दशकातील त्यांच्या सुरुवातीच्या संशोधनांमुळे भारतातील पहिले जैवमंडळ राखीव म्हणून निलगिरीची ओळख पटवण्यात मदत झाली आहे. जैविक विविधता कायदा २००२ च्या तयारीतही त्यांचा मोलाचा हातभार आहे. पश्चिम घाटाचे संशोधन करून शासनाला घाटातील पर्यावरण रक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवले होते.

या क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना मरणोत्तर २०२५ चा 'चिरमुले पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ. कै. मनमोहन सिंग, डॉ.विजय भटकर, डॉ.अनिल काकोडकर, कै.रतन टाटा, कै.राहुल बजाज, डॉ.सी.रंगराजन, श्री. गुलजार, डॉ.सायरस पूनावाला, डॉ.राजेंद्रसिंह, डॉ.हिम्मतराव बावस्कर, नाम फौंडेशन आदि आदरणीय व्यक्ति व संस्थांना या पुरस्काराने गौरविले आहे.

पुरस्कार प्रदान करतेवेळी कै. माधव गाडगीळ यांचे जावई किरण शहा आणि ट्रस्टचे विश्वस्त .डॉ.अच्युत गोडबोले, श्री. समीर जोशी तसेच आयडीबीआय ट्रस्टी तर्फे सौ .मानसी माचवे व सौ. मानसी पतकी व गाडगीळ कुटुंबियांचे स्नेही रमण वेलणकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande