हिंदू नाव धारण करून मुलींना फसवणारे रॅकेट अमरावतीत सक्रिय, लैंगिक शोषणाचे प्रकार - शिवराय कुळकर्णी
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) अमरावती शहरात रस्त्यांवर चायनीजच्या गाड्या लावणाऱ्या मुस्लिम हॉकर्सनी हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. एका हिंदू युवतीच्या तक्रा
हिंदू नाव धारण करून मुलींना फसवणारे रॅकेट अमरावतीत सक्रिय लैंगिक शोषणाचे प्रकार     शिवराय कुळकर्णी


अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.)

अमरावती शहरात रस्त्यांवर चायनीजच्या गाड्या लावणाऱ्या मुस्लिम हॉकर्सनी हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. एका हिंदू युवतीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन मुस्लिम आरोपींना अटक केली आहे.

हे प्रकरण एका युवतीला फसवायचे नसून यातील मुख्य आरोपी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण याने याच पद्धतीने अनेक युवतींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केले असल्याचा खळबळ जनक आरोप पीडित युवतीने केला आहे. रियाजउद्दीनची चायनीज गाडी पंचवटी चौकात BPEd कॉलेज जवळ उभी असते. हिंदू नाव धारण करून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या, लग्न ठरत नसलेल्या किंवा कुठल्यातरी समस्येने ग्रस्त असलेल्या तरुणींना सुरुवातीला आधार देण्याचे नाटक करायचे आणि नंतर प्रेमाचे नाटक करून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा धंदा रियाज उद्दीनने केला आहे. हे करण्यासाठी त्यांनी हिंदू नाव धारण केले होते. रियाझउद्दीन स्वतःचे नाव राजू असे सांगायचा. शिवाय आपल्याला बंगालची जादू येते आणि त्या जादूच्या आधारे तुला समस्येतून मुक्त करून देईल अशी भोंदूगिरी देखील तो करायचा. समस्याग्रस्त युवतींना अज्ञात स्थळी नेऊन उपचारांच्या नावाखाली हळूहळू त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला अत्तर लावणे आणि असे करता करता त्या युवतींवर शारीरिक ताबा मिळवायचा असे भयंकर प्रकार या रियाजुद्दीन केले आहे.

अमरावती पोलिसांनी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण याच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. पण हे प्रकरण केवळ बलात्काराचे नसून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पिडीतेच्या कथनावरून निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेली हॉकर्सची दादागिरी संपूर्ण ची गरज देखील या निमित्ताने निर्माण झाली आहे. परतवाड्याचे प्रकरण जेवढे गंभीर आहे तेवढेच किंवा त्याहूनही जास्त गंभीर प्रकरण रियाजुद्दीनचे आहे. ज्या ज्या युवती याच्या जाळ्यात फसल्या त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढून त्यांना नेहमीसाठी ब्लॅकमेल करण्याची पद्धत रियाजउद्दीन वापरत होता. अमरावती पोलिसांनी याप्रकरणी केवळ एक बलात्काराचे प्रकरण न पाहता यामागे सक्रिय असलेले रियाजउद्दीन व त्याच्या साथीदारांचे रॅकेट शोधून काढले पाहिजे, लव जिहादचा हा नवा प्रकार आहे. हिंदू युवतींनी हॉकर्सची खात्री करूनच त्यांच्या गाडीवर जाण्याचा निर्धार केला पाहिजे असल्याचे मत शिवराय कुळकर्णीप्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र यांनी निवेदनातून केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande