
श्रीसंत गुलाबबाबा यांच्या भक्त मंडळांची मागणी अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) । संत गुलाबबाबा यांच्या संदर्भात हेतुपरस्सरपणे आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल श्याम मानव यांच्यावर कायदेशीरकारवाई करण्याची मागणी श्री संत गुलाबबाबा भक्त मंडळाने केली आहे. याप्रकरणी भक्तांनी श्याम मानव यांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांनानिवेदन सादर केले आहे.
शयाम मानव यांनी संत गुलाबबाबा यांच्यावर अपमानास्पद, आक्षेपार्ह भाष्य केले होते. यामुळे लाखो भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. श्री संत गुलाबबाबा हे महाराष्ट्र सह, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात, आणि मध्यप्रदेश येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आजही टाकरखेडा मोरे येथील त्यांच्या समाधी स्थळी वर्षभर अन्नदान, धर्मार्थ दवाखाना, गोरक्षण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. निवेदन देताना तालुक्यातील श्री संत गुलाबबाबायांचेहजारो भक्त मंडळी उपस्थित होते. गुन्हा दाखल करावा यासंदर्भात ऍड. गोपल उमक म्हणाले की, सुमारे २६ वर्षापूर्वी समाधिस्त झालेले सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबा या संतांबाबत अश्लील व्यक्तव्य तथ्य नसतांना बोलू नये. त्यांनी अंधश्रद्धेवर बोलावं. आमच्या गुरूंनी नेहमी अंधश्रद्धेचा विरोधच केला. आम्ही त्यांना माफ करणार नाही त्यांचेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
अंजनगाव सुर्जीचे पोलिस निरीक्षक सूरज बोंडे यांनी सांगितले की, सभेचे अवलोकन करणार अंनिसचे शयाम मानव यांच्या नाशिक व अकोला येथे झालेल्या सभेचे अवलोकन करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. श्री संत गुलाब बाबा भक्त मंडळीचे निवेदन डिजी नाशिक वजिल्हा पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी