
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। पैठण येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात शहरासह परिसरातील गावांतील प्राणीमालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या मोहिमेत एकूण ६३ प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ४९ कुत्र्यांचा समावेश आहे. विशेषम्हणजे यापैकी १२ मोकाट श्वान असल्याची नोंद आहे. रेबीजसारख्या गंभीर आजारापासून संरक्षणासाठी हे लसीकरण पूर्णपणे मोफत करण्यात आले. हे शिबिर पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. आझाद पानसरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव देशपांडे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. पशुधन पर्यवेक्षक गायत्री गारे, ज्ञानेश्वर कदम, विकास साटोटे, प्रताप दरंदले, विवेक गोरडे व सागर औरंगे यांनी सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis