माजी सैनिक कुटुंबीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ; महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कंत्र
माजी सैनिक कुटुंबीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ; महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया


छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

कंत्राटी पद्धतीने महिला सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असून इच्छुक पात्र उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनासह विविध शासकीय लाभ मिळणार आहेत.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर सहा महिन्यांनी वाढीव महागाई भत्ता,कामगार कायद्यानुसार ईपीएफ,ईएसआय,ग्रॅज्युइटी आदी सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.माजी सैनिक पत्नी,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांनी या भरती प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,येथे दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२५५७ किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८५२७५५४ वर संपर्क साधता येईल.तसेच श्री.गंगाधर गायकवाड यांच्याशी ९४२२३०७५९३ या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.

माजी सैनिक कुटुंबीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही भरती मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असून पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande